सतराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या क्षितिजावर एक नवे घराणे उदयाला येऊ लागले होते. सासवडचे पुरंदरे ! राजाराम महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत रुजू झालेल्या या घराण्याने अगदी पेशवाईच्या अखेरच्या क्षणापर्यंत स्वराज्याची मनोभावे सेवा केली. कोकणातून वरघाटी आलेल्या बाळाजी विश्वनाथांना प्रथम आसरा मिळाला तो पुरंदर्यांच्याच वाड्यात. प्राप्त होत असलेला पेशवाईचा मान मोठ्या मनाने श्रीवर्धनच्या भटांना दिला पुढे पेशव्यांनीही याचे उपकार म्हणून पुरंदर्यांना सातारा दरबारात मुतालकी आणि सरदारी दिली. अशा या ऐतिहासिक घराण्यातील कर्तबगार पुरुषांची ही कामगिरी. कौस्तुभ कस्तुरे लिखित "पुरंदरे - अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे". ह्या पुस्तकात अठराव्या शतकात पुरंदरे घराण्याला छत्रपती शाहू महाराजांपासून ते सवाई माधवराव पेशव्यांकडून आलेली अस्सल मोडी इनामपत्रे तसेच त्र्यंबक सदाशिव तथा नाना पुरंदर्यांना आलेली काही महत्वाची पत्रे प्रकाशित करण्यात येत आहेत.
Read More
Specifications
In The Box
Sales Package
1 Book
General
Book
Purandare
Author
Kaustubh Kastur
Binding
Hardcover
Publishing Date
2016
Publisher
Rafter Publications
Edition
1
Number of Pages
208
Language
Marathi
Genre
History and Politics
Book Subcategory
Other Books
Dimensions
Weight
350 g
Be the first to ask about this product
Safe and Secure Payments.Easy returns.100% Authentic products.