पुस्तकाविषयी
राजकीय पत्रकारितेविषयी अद्ययावत माहिती देणारे पुस्तक
राजकीय पत्रकारितेचे स्वरूप, त्याची व्याप्ती, राजकीय पत्रकारितेचा इतिहास यांची माहिती
राजकीय पत्रकारासाठी आवश्यक गुण, आवर्जून कराव्यात अशा आणि अजिबात करू नयेत अशा गोष्टी, कसे वागावे आणि कसे वागू नये याविषयी मार्गदर्शन
मुलाखत कशी घ्यावी, बातमी कशी लिहावी याविषयी मार्गदर्शन
प्रिंट मिडीया, टीव्ही, रेडिओ, इंटरनेट, वेब पोर्टल्स, सोशल मीडिया अशा सर्व माध्यमांतील पत्रकारितेची वैशिष्ट्ये
राजकीय पत्रकारिता क्षेत्रातील आणि इतर संलग्न क्ष्रेत्रातील उपलब्ध संधी
सर्वसामान्य विद्यार्थी, या क्षेत्रात काम करणारे पत्रकार, शिक्षक अशा सर्वानाच उपयुक्त
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष कला शाखा अभ्यासक्रमातील "राजकीय पत्रकारिता" या विषयासाठी उपयुक्त
लेखक परिचय
Adv. डॉ. बाळासाहेब जगन्नाथ बोठे पाटील ३० वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. शोधपत्रकारितेसह राजकीय, सामाजिक, सहकार, कृषी आदी विषयांत लेखन. अहमदनगर सकाळ आवृत्तीचे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणाचा विशेष अभ्यास. कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे, वारसदार, कारभारणी, समाजभान, मुद्दे आणि गुद्दे, कानोकानी-पानोपानी, चिमटे आणि गुदगुल्या आदी पुस्तके प्रकाशित. शोधपत्रकारिता, सर्वोत्कृष्ट वार्तांकन, ग्रंथलेखन आदींसाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार. विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रम मंडळासाठीचे सदस्य (Member of Board of Studies)