Ravana : Raja Rakshasancha by Sharad Tandale

Ravana : Raja Rakshasancha by Sharad Tandale (Marathi, Paperback, Sharad Tandale)

Share

Ravana : Raja Rakshasancha by Sharad Tandale  (Marathi, Paperback, Sharad Tandale)

Price: Not Available
Currently Unavailable
Author
Read More
Highlights
  • Language: Marathi
  • Binding: Paperback
  • Publisher: Nexus Publishing House
  • Genre: Indian Writing
  • ISBN: 9788193276181, 8193276183
  • Edition: 1, 2017
Description
तो एक ब्राह्मण राजा होता. त्याचे वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले तर त्याची आई केकसी ही दैत्य कुळामधली. रावणाचे आजोबा पुलस्त्य ऋषी हे अत्यंत थोर व्यक्ती होते. ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून साकारलेल्या सप्त (सात) ऋषीं मंडळातील ते एक. हिंदूंनी रावणाला खलनायक, एक नकारात्मक, एक प्रतिस्पर्धी, विरोधी भूमिकेमध्ये प्रक्षेपित केले गेले. रावणाचा जीवनपट एका दंतकथेसारखा रामायणात साकारला आहे. ह्याला एक आख्यायिका, दंतकथा वाङमय, एक पुराण समजले गेले. “रावण” ह्या नावाचा देखील शाब्दिक अर्थ दिला गेला आहे. ” रु” रुवयती- इति- रावणाह अर्थात जो आपल्या अनुकंपेने दयाबुद्धीने देवाला प्रेम करावयास लावतो. ( One who makes god love by his compassion Actions ) रावणामधील “रा” म्हणजे सूर्य दर्शवितो. आणि वणा म्हणजे पिढी अर्थात Generation. ३ रावणाचे खासगी जीवन फक्त ऐकण्यासारखेच नाही. ते समजण्यासारखे, अभ्यासण्यासारखे आहे. जगाच्या इतिहासात एवढे भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व दुसऱ्या कुणाचे असेल असे वाटत नाही. अत्यंत धार्मिक वृत्तीचा त्याचा पाया होता. तो महान शिवभक्त होता. त्याला तपोबलाची पूर्ण जाण होती. त्यानी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तप केले. ब्रह्मदेवाकडून त्यानी अमरत्वाचा वर मागितला. अमरत्व हे कुणालाही दिले गेले नव्हते. निसर्ग नियमांच्या ते एकदम विरोधी होते. परंतु रावणाची तपश्चर्यादेखील दुर्लक्ष करण्यासारखी साधी बाब नव्हती. रावणाला दशानन अथवा दशग्रीव्हा (दशमुखी) हे नांव पडले होते. याच्या अर्थ ज्याला दहा तोंडे मिळाली आहेत असा. दहा तोंडे ह्याचा शाब्दिक अर्थ त्याच्या महानतेकडे घेऊन जातो. रावण अतिशय विद्वान पंडित होता. त्याला चार वेद आणि सहा उपनिषद यांचे सखोल व संपूर्ण ज्ञान होते. प्रत्येक विषयामधील एकेका विद्वानाची (Total Ten Scholars) बौद्धिक योग्यता केवळ एकट्या रावणामध्ये एकवटली होती. हीच १० पंडितांची विद्वत्ता एकाच व्यक्तीमध्ये असल्यामुळे, त्याला १० तोंडांची उपमा दिली जाते. अविचारी लोक १० तोंडाची संकल्पना त्याच्या असुर असण्यावर लावतात. टीका करतात. त्याच्या पांडित्याची जाण रामाला देखील होती. राम त्याला आदराने महाब्राह्मण (Mahabrahmin ) संबोधित असे. म्हणूनच जेंव्हा रावण शरपंजरी पडला, तेव्हा रामाने त्याला अभिवादन केले. रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली ”तू रावणाजवळ जा आणि रावणाकडून जीवनाचे गुपित आणि महानता ही समजून घे.” रामाने जो अश्वमेध यज्ञ केला होता त्याचे एक कारण होते ब्रह्महत्या दोषाचे पापक्षालन करणे हे सुद्धा होते. (ती त्या काळानुरूप संकल्पना होती. गुरू वसिष्ठ यांनीच रामास तसे सुचविले होते. लंकाधिपती रावण ही रामायणातील एक उत्तुंग, भव्य, दिव्य व्यक्तिमत्व प्राप्त रुपरेखा होता. रावणाचे पिता ऋषी विश्रवा हे वेद,उपनिषदे ह्या शास्त्रांत पारंगत होते. त्यानीच रावणाला हे शास्त्र ज्ञान दिले. त्याच प्रमाणे शस्त्र विद्येतही तरबेज केले होते. रावणाचे एक आजोबा अर्थात आईचे वडील राजा सुमाली यानी त्याला दैत्य संकल्पनेत शिक्षण दिले होते. कुबेर याला देवांचा धन खजाना बाळगणारा समजले गेले. ( A treasure of God ). हा रावणाचा थोरला भाऊ म्हणजे विश्रवा ऋषींचा पहीला मुलगा होता. कुबेर हा लंकाधिपती होता. परंतु रावणाने लंकेचे राज्य मागितले. ऋषी विश्रवा याना रावणाचे शक्तिसामर्थ व महान बुद्धिमत्ता ह्यावर विश्वास होता. यांनी कुबेराची समजजू घातली व राज्य रावणास देऊ केले. एक मात्र सत्य होते की रावणाने लंकेचे राज्य अत्यंत यशस्वीपणे चालवले. सर्व गरीब जनता, सामान्यजण, धार्मिक ऋषीमुनी त्याच्यावर खूश होती. तो सर्वावर प्रेम करी. त्या काळी प्रत्येकाकडे सोन्याची भांडी होती. त्रेतायुगाच्या मानवी वैचारिक नीतिअनीतीच्या संकल्पनेतील फक्त एक अघोरी दुष्टकृत्य रावणाच्या हातून घडले. नीतिमत्ता व निरोगी समाज धारणा ह्याची लिखित वा अलिखित मूल्ये ही सुसंस्कृतपणाची लक्षणे. ही सनातनी व म्हणून अतिप्राचीन समजली गेली. रावण आयुर्वेद शास्त्र ( Ayurveda Science ) जाणत होता. त्याला राज्यशास्त्राचे ( Political Science ) ज्ञान होते. हिंदू फल ज्योतिष्य शास्त्र ( Astrology ) ह्या विषयांत तो तज्ज्ञ होता.. रावण हा रामायण काळातील लंकेचा राजा होता. अनुराधापूर ही रावणाची राजधानी होती. त्याला दशानन म्हणून ही ओळखतात. त्याला दहा तोंडे नव्हती की वीस हात नव्हते. तो शरीराने सर्वसामान्य होता. ’रावण’ हे नाव त्याला शंकराने दिले. अनेकांनी त्याला आपल्या परीने श्रेष्ठ खलनायक म्हणून रेखाटण्याचा फार प्रयत्न केला. विश्वातले सर्व दुर्गण त्यात एकवटण्याचा प्रयत्न केला गेला आहे. खरे पाहता रावणाने रामाहून अधिक व श्रेष्ठ विद्या प्राप्त केली होती. तो कला, शास्त्र , विद्या, बल यांत रामाहून वरचढ होता. रावणाला चारही वेद आणि सहा उपनिषदे याचे संपूर्ण ज्ञान होते. तो उत्तम आयुर्वेदाचार्य होता. वडील विश्रवा ब्रम्हकुळातले तर माता कैकसी ही उच्च, दानव कुळातील होती.
Read More
Specifications
Book Details
Publication Year
  • 2017
Translation Details
Source Language
  • English
Have doubts regarding this product?
Safe and Secure Payments.Easy returns.100% Authentic products.
Back to top