मी सचिननाथ महाराज माँ कामाख्या माता , माँ सप्तश्रुंगी माता आणि श्री. मच्छिंद्रनाथ नाथ महाराज यांच्या आशिर्वादाने व कृपा दृष्टीने माँ आदिशक्ती सति मातांचा ग्रंथ हस्त लिखित करतोय. मला माँ कामाख्या मातांचा आदेश झाला का तुम्हांला माता सति यांचा ग्रंथ मृत्युलोकात प्रथम वेळेस आणायचा आहे. आणि तुम्हांला हा ग्रंथ सप्तश्रुंगी माता सांगतील आणि तुम्हांला हस्तलिखित करून संसारात माता सतींच्या पूजनासाठी त्याचं अस्तित्व निर्माण करायच आहे, माता सतींचे या संसारात प्रतिमा स्वरूप किंवा प्रकृति स्वरूप कुठे हि स्थान नाही आहे त्यामुळे ह्या ग्रंथाच्या स्वरुपात माता सतींचे कलियुगात मनुष्य भक्तिपूर्वक पूजन करण्याचा प्रयत्न करतील. या पध्दतीने श्रावण मास – शुक्ल पक्ष – पंचमी – शके १९४० ( १५ अगस्ट २०१८ ) या दिवशी माता सप्तश्रुंगी यांनी ग्रंथ बोलायला सुरुवात केली आणि मी हस्तलिखित करायला सुरुवात केली. मला संस्कृत चे ज्ञान नव्हते व शुध्द हिंदी भाषा हि लिहू शकत नव्हतो, जे सप्तश्रुंगी मातांनी सांगितले तेच हस्तलिखित करण्याचा प्रयत्न केला. सप्तश्रुंगी मातांनी ग्रंथ संस्कृत आणि हिंदी मध्ये दिलेला आहे त्याच मराठी भाषेत परिवर्तन करून तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही माता आदिशक्ती चे भक्तिपूर्वक पारायण करून त्यांचे पूजन कराल यासाठी हा ग्रंथ आपल्या सेवेत समर्पित करतोय. आणि एक महत्वपूर्ण विषय सगळ्यांना सांगतोय, या माता आदिशक्ती सति मातांच्या ग्रंथाची आपल्या कडून सेवा , भक्ती व पूजन नाही होत असेल तर एखादा उचित व्यक्ती ला ज्याच्या कडून ग्रंथाची सेवा होईल त्याला देवून टाकायचा, अन्यथा तुम्ही या ग्रंथाला अपमानित करून कलियुगाला समर्प्रीत होवून जाणार.