मोहन दातार हे ७४ वर्षाचे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रले तज्ञ आहेत. त्याना आयटी क्षेत्र ५० वर्षापक्षा अधिक अनुभव आहे. ई-गव्हर्नन्समधे त्यानी मोलाचे योगदान दिले आहे. या कार्यप्रणालीवर त्यांचे शोधनिबंध राष्ट्रीय त आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेले आहेत. मुंबईतील NMIMS संस्थेत अनेक वर्षे ते ई-गव्हर्नन्स हा विषय शिकवत होते. तसेच हैदराबादच्या ESCI संस्थेसोबत "Electricity Metering, Billing Collection” या विषयाचे “Course Director" म्हणून संलग्न होते. Computer Society of India साठी त्यानी भारतातील पहिल्या ई-गव्हर्नन्स अवॉर्डचा आराखडा तयार केला आणि ते त्याचे पहिले संचालक होते. गेल्या सहा वर्षापासून ते पुन्हा संस्कृतचा अभ्यास करीत आहेत. संस्कृत भाषा, साहित्य, व्याकरण, उपनिषदे व न्याय-वैशेषिक दर्शने हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्याशिवाय इंडॉलाजी मंदिर स्थापत्य शास्त्र, प्राचीन विज्ञान, गणित आणि ज्योतिषशास्त्रातही त्याना रुची आहे. संस्कृत भाषेची गोडी जास्तीत जास्त लोकाना लागावी या इच्छेतून त्यानी हे पुस्तक संकलित केले आहे.