*वैद्यकशास्त्र आज केवढं प्रगत झालंय पण तरीदेखील आधुनिक मानव निरोगी नाही. असं का ?
*पूर्वीचे लोक जितके आरोग्यसंपन्न असायचे तितके आत्ताचे लोक का नाहीत ?
याचं कारण, सध्या जी औषधोपचार पद्धती वापरली जाते त्यामध्ये दुर्दैवाने आजाराच्या मूळ समस्येकडे लक्ष दिलं जात नाही. वरवरच्या लक्षणांवरच उपाय केला जातो. मुळात, कोणताही आजार पेशींमधील उपयुक्त ऊर्जा कमी होऊन उपद्रवी ऊर्जा वाढल्यामुळे होत असतो. या मूळ समस्येकडे लक्ष दिलं गेलं नाही, तिचं निराकरण केलं गेलं नाही तर आपलं आरोग्य सुधारणं अवघड आहे. यावर लेखिकेने सखोल संशोधन केले आहे. या आधुनिक आरोग्य समस्यांवरील उपाय त्यांनी शोधून काढला आणि तो पुस्तकरूपाने आपल्यासमोर मांडला आहे. त्यांनी पेशीविज्ञानाचा अभ्यास करून "गुड एनर्जी अर्थात उपयुक्त ऊर्जा"ची संकल्पना मांडली आहे. आपल्या पेशींचं कार्य सुधारलं, त्यातील बिघाड दुरुस्त झाला तर आपलं शरीर आणि मन दोन्हीही आरोग्यसंपन्न राहतं, ते कसं याबद्दल या पुस्तकात सांगितलं आहे.
*गुड एनर्जी म्हणजे काय आणि ती कशी टिकवायची ?
*मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरोग, संधिवात.... अशा असंख्य आजारांची सखोल माहिती व त्यावरील उपाय
*आरोग्य क्षेत्रातील अनेक व्यावसायिकांकडून (औषध कंपन्या, फुड प्रॉडक्टस् कंपन्या, डॉक्टर्स) होणारी दिशाभूल
*स्वतःचे मेडिकल रिपोर्ट (लिपिड प्रोफाईल, शुगर रिपोर्ट वगैरे...) कसे समजून घ्यावेत.
*गुड एनर्जी वाढवणारा आहार
*झोप, जैविक घड्याळ आणि चयापचय यांच्यातील महत्त्वाचे दुवे
*उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात सहज चालता-बोलता करता येण्याजोगे व्यायाम प्रकार